Author: breakingvidarbha

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री साडे बारा वाजता दरम्यान घडला.डॉक्टर ज्योती क्षीरसागर (राहणार. मालेगाव, जिल्हा -वाशीम ),डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे (राहणार -अमरावती ), भरत क्षीरसागर (राहणार. मालेगाव, जिल्हा -वाशीम )अशी मृतकाची नाव आहे.घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी पोहचत वाहतूक सुरळीत केली.  समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जातं असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून जबर धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव येथून नागपूरला जातं असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह…

Read More

वर्धा : हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्यासोबतच किफायतशीर शेती व्यवसायास सहाय्य करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 2 हजार 688 शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यासाठी 4 कोटी 76 लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ त्यांना देण्यात आला आहे. राज्यात 15 जिल्ह्यातील 5 हजार 142 गावांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. हवामान बदलास असुरक्षितता, संवेदनशीलता आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यांच्या एकत्रित निर्देशांका नुसार गाव समूह निश्चित करण्यात आले तसेच लघुपाट बंधाराचे सरासरी क्षेत्र सुमारे 5 हजार हेक्टर एवढे असून यामध्ये सरासरी सात…

Read More

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव येथील राजेश डफर या शेतकऱ्यांने काळ्या गव्हाचे उत्पादन घेतले. विदर्भात या गव्हाचे पीक कमी प्रमाणात घेतले जात असले तरी या गव्हाचे फायदे खूप जास्त असल्याने नागरिक बाहेरून हा गहू विकत आणतात. या शेतकऱ्याने एक एकर शेतात 18 क्विंटल इतक्या काळ्या गव्हाचे उत्पादन घेतले आहे. काळा गहू शरीरासाठी चांगला असल्याचे राजेश डफर या शेतकऱ्याने गुगल वर वाचले होते, या गव्हाचे फायदे मोठ्या प्रमाणात असल्याने त्याची लागवड करण्याची त्यांनी मानसिकता तयार केली आणि काळ्या गव्हाचे बियाणे कुठे मिळतात याचा शोध सुरू केला. या काळ्या गव्हाच्या पोळ्या खाल्ल्याने पोटाचे विकार होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी विचारपूस केल्यानंतर…

Read More

वर्धा  –  आर्वी तालुक्यातील कासारखेडा या गावात एका शेतकऱ्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर, पॉवर विडर, पावर ट्रीलर यासारखी यंत्रे तयार केली आहे. आंतर मशागत आणि तण नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या यंत्राचा फायदा उत्पादनात वाढ होण्यासाठी होत आहे. शेतीमधील कामासाठी मजूर उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेतातील कामे वेळेवर पार पाडली जात नसल्याने शेतकऱ्याला नुकसान देखील सोसावे लागतंय. त्यासाठीच कासारखेड येथील शेतकऱ्याचा हा यंत्र निर्मितीचा प्रयोग शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरत आहे. यात स्क्रॅप मधील विविध पार्टचा देखील वापर करण्यात आला आहे.  योगेश माणिकराव लीचडे हे खरांगणा नजीकच्या कासारखेड या गावात राहतात.   त्यांच्याकडील तीन एकर शेतीवर वारंवार ट्रॅक्टर सारख्या मोठ्या यंत्राचा वापर करणे शक्य…

Read More

वर्धा : शेतकऱ्यांच्या कपाशीच्या दरात सतत घसरण होत असताना शेतकऱ्यांनी मोर्चा काढत आक्रोश केला आहे. कारंजा येथे शेतकऱ्यांनी एकत्र होत जयकुमार बेलखडे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढला. बैलगाडीवर स्वार होत शेतकरी मोर्चात सहभागी झाले. ग्रामीण भागातून कापूस दरवाढीसाठी एकवटलेल्या शेतकऱ्यांमध्ये महिला शेतकऱ्यांचा देखील समावेश होता. यावर्षी कपाशीचे भाव आठ हजार रुपयांच्या आसपास होते. ते देखील गेल्या काही दिवसात सातशे ते आठशे रुपयांनी कमी झाले आहे. शेतकऱ्याने पिकविलेल्या कापसाला भाव मिळाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी कारंजा तालुक्यात आवाज उचलला आहे. शेतमालाचे भाव सतत कमी होत आहे. सोयाबीनला भाव नाही, कपाशीला   भाव नाही, चण्याची अवस्था देखील तशीच आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला…

Read More

वर्धा : शेतकऱ्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात भिजतो. ही नेहमीची समस्या सोडविण्यासाठी शेड देखील उभारण्यात आले. पण व्यापारी, दलाल आणि प्रशासकीय अतिक्रमनाने शेड देखील कमी पडू लागले आहे. सातत्याने शेतकऱ्यांसाठीचे शेड शेतकऱ्यांनाच मिळत नसल्याने बाजाराच्या यार्डातील शेती पिकावर अवकाळीचे संकट घोंगावत आहे. वर्ध्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. काही ठिकाणी पाऊस देखील झाला. शेतकऱ्यांचा शेतातील शेतमाल वाचविण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आल्या. तर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतपिकाची काळजी आधीच घेतलेली होती. पण शेतातील शेतीपिक हातून जाईल अशी भीती शेतकऱ्यांना आहेच. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आणलेल्या शेतमालाची देखील चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. वर्षभर कष्ट…

Read More

वर्धा : सेवाग्राम येथे झालेल्या सर्वोदय समाज संमेलनात लोकतंत्र वाचविण्यासाठी सदैव पुढाकार घेण्याचा संकल्प करणारा ठराव पारित करण्यात आला. संमेलन आणि सर्वोदय समाज लोकतंत्र, संविधान व धर्म निरपेक्षता वाचविण्याकरिता प्रत्येक संघर्षात सहभागी व पुढाकार घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. चिन्मय मिश्र यांनी या ठरावावर निवेदन केले. तर या प्रस्तावावर सर्वांचे एकमत झाले. यावेळी मंचावर जेष्ठ गांधीवादी तथा सर्व सेवा संघाचे अध्यक्ष अमरनाथ भाई, विद्यमान अध्यक्ष चंदन पाल, गांधीवादी अशोक भारत, सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्ष आशा बोथरा, गांधीवादी गौरांग महापात्रा, चिन्मय मिश्र, अविनाश काकडे, विदर्भ भूदान मंडळाचे एकनाथ डगवार, सर्व 22 राज्याचे सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष मंचावर उपस्थित होते. यावेळी…

Read More

वर्धा : वर्ध्यात दुचाकी दुरुस्त करीत असतानाच अचानक पेट्रोलचा भडका उडून  दुचाकीने पेट घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. पाहता पाहता ती दुचाकी जळून कोळसा होत फक्त व सांगाडाच उरला.बॅचलर रोडवर असलेल्या काँग्रेस कमिटीच्या सद्भावना भवनच्या लगत घडली. या घटनेमुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली होती. मंजू जालन रा. बोरगाव (मेघे) यांची दुचाकी अचानक खराब झाल्याने ती दुचाकी घेऊन त्या बॅचलर रोडवरील सद्भावना भवनाच्या खाली असलेल्या सुरेश गाडी रिपेअरिंग सेंटरमध्ये घेऊन गेल्या. दुचाकी दुरुस्ती करीत असताना पेट्रोल लीक होत होते. दरम्या न अचानक करंट चेक करीत असताना दुचाकीने पेट घेतला. कारागिराला काही कळण्यापूर्वीच दुचाकीचा भडका उडाला. लागलीच या दुचाकीच्या आगीने…

Read More

वर्धा : आपण जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत, पंरतु आपल्या महिला खरच सक्षम झाल्या आहे का, प्रत्येक महिलांमध्ये गुणवत्ता असते त्याचा उपयोग समाजातील इतर महिलाना होईल यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे. आपला समाज झपाट्याने बदलत आहे, देशाच्या विकासाचा प्रवास गतिमान करायचा असेल, तर मुलगा-मुलगी हा भेद नष्ट करून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण एका मोठ्या वर्गाकडे दुर्लक्ष करून कोणतेही राष्ट्र प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. महिलांनी विकासात सहभागी होण्यासाठी त्यांना लहानपनापासून मुले-मुली समान आहे ही शिकवन देणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ इतर महिलांना कसा होईल यासाठी पुढाकार घेऊन केन्द्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील…

Read More

वर्धा : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटूंबांना उत्पन्नाचे हक्काचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविली जाते. या योजनेतून 100 टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यात योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 202 शेतकऱ्यांना 570 एकर शेतजमीन देण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील गरीब लाभार्थ्यांकरीता ही योजना सन 2004-05 पासुन राबविण्यात येत आहे. दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटूंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावेत व त्यांच्यात आर्थिक स्थैर्यता निर्माण व्हावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या या योजनेने असंख्य कुटूंबांना दिलासा दिला आहे. या योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील तसेच दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे…

Read More