- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Author: breakingvidarbha
वर्धा : जयहिंद फाउंडेशन वर्धा, जय पवनसूत हनुमान मंदिर ट्रस्ट वर्धा, आणि माजी सैनिक परिवार यांच्या कडून शहिद तुकाराम ओंबळे सभागृह वर्धा येथे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले. येथे आयोजित श्रद्धांजली पर कार्यक्रमात शहीदांचे स्मरण करण्यात आले. जगभरात आज ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जात असताना भारतात मात्र हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जात आहे. पाच वर्षा अगोदर 14 फेब्रुवारी या दिवशी जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील लेथापोरा येथे केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्सच्या ताफ्यावर दुपारी ३.१५ वाजता आत्मघाती हल्लेखोरांच्या भ्याड हल्ल्यात ४० सैनिकांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. त्यांच्या सर्वोत्तम बलिदानाला न विसरता स्मरण करण्यासाठी, जयहिंद फाउंडेशन वर्धा, जयपवनसुत…
अवकाळी पावसाचा तडाखा; संत्रा गहू हरभरा पिकाचे नुकसान कारंजा तालुक्यात गारपीट व मुसळधार पाऊस वर्धा : अवघ्या अर्धा ते पाऊण तास झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला. हातातोंडाशी आलेला घास अवघ्या काही तासात झालेंल्या अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतपिकांवरून शेतकरी स्वप्न रंगत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात शेतातील नुकसान बघता पाणी आल्याशिवाय राहत नाही. वर्धा जिल्ह्यातील आष्टी व कारंजा तालुक्यातील काही भागात गुरुवारी सायंकाळी विजेच्या कडकडाट,वादळी वाऱ्यासह ,गारपीट व मुसळधार पाऊस झाला.या पावसात हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. कारंजा तालुक्यातील गवंडी, पिपरी, धावसा, येनगाव, मोर्शी, खरसखांडा, हेटीकुंडी, भालेवाडी, जुनापाणी, कारंजा, वाघोडा,…
महिला व युवकांचा मोर्चात मोठा सहभाग शहरातील मुख्य मार्गाने निघाला मोर्चा वर्धा : हिंगणघाट शहरात आपल्या हक्कासाठी ओबीसी बांधव एकत्र आले आहे. ओबीसींचे आरक्षण कमी होऊ नये, ओबीसींची जनगणना व्हावी, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसींमधून आरक्षण देऊ नये अशा विविध मागण्यासाठी हिंगणघाट शहरात आज ओबीसी संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. या मोर्चात माजी आमदार राजू तिमांडे, काँग्रेसचे पंढरी कापसे, माजी नगरसेवक सतिश धोबे,निता धोबे याच्या सह अनेक नेत्यानी आणि ओबीसी संघटनेचे नेते सहभागी झाले होते. हरीओम सभागृहातून या मोर्चाला सुरवात करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्याने हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहचला आहे. विविध ओबीसी संघटना, सामाजिक संघटना, राजकीय…
देठ सुकी रोगाने 30 ते 40 टक्के संत्रा फळाची गळ, शेतकऱ्याचं मोठं नुकसान अमरावती(ब्युरो) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील अनेक गावांत संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे. संत्रा फळांना गळती लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ही फळगळ नेमकी थांबवावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वर्ध्या जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृग बहाराचा संत्रा उत्पादक शेतकरी आहे. या संत्र्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तोडणीला आलेला संत्रा फळांवर देठ सुकी रोगांचा पादुर्भाव वाढल्याने संत्रा मोठ्या प्रमाणात गळ सुरू झाली आहे. रोगांचा पादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होत आहेय. कृषी विभागाकडून दिलेल्या उपाय योजनेच्या माहितीनुसार कोणताही परिणाम होत नसल्याने…
बससेवा उपलब्ध करून देत ‘आपला माणूस’ दरवर्षी येतो मदतीला घोराड यात्रेसाठी मोफत बस सुविधा ; अभ्युदय मेघे यांचा पुढाकार वर्धा: तिर्थस्थळी पोहचायचे असेल तर ‘आपला माणूस’ तुमच्या मदतीला धावून येईल ही हमीच आता ग्रामीण भागातील नागरिकांना झाली आहे. यावर्षी देखील बससेवा घेऊन आपला माणूस सेलू तालुक्यात पोहचला आहे. घोराड येथील केजाजी पुण्यतिथी महोत्सवात ग्रामीण भागातून पोहचायचे कसे? हा गावखेड्यातील नागरिकांना पडणारा प्रश्न सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे डॉ. अभ्युदय मेघे यांच्याकडून सोडविला जातो. दरवर्षी बससेवा उपलब्ध करून घोराड नगरीत पोहचण्याचा मार्ग सुकर केला जात आहे. सेलू तालुक्यातील घोराड येथे श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात…
वर्धा – यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर शिरपूर येथे पुलावरून कार कोसळली एक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी वर्धा : वर्ध्यावरून यवतमाळ कडे येणाऱ्या इनोव्हा कारला शिरपूर येथे भीषण अपघात झाला. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर येणाऱ्या शिरपूर येथे वर्धा नदीवर असणाऱ्या पुलावरून ही गाडी खाली कोसळली. वाहनचलकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. गाडीमध्ये तिघे जण प्रवास करीत असल्याची माहिती आहे.या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. गाडी पुलावरून पाचशे फूट खाली कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. कळंब पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
वाकेथॉन मधून वॉक ऑन राईट चा संदेश वर्धा : वर्ध्यात बुधवारी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन आणि वाहतूक शाखेच्या वतीने वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमधून रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात आला आहे. या वॉकेथॉन रॅलीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, न्यु आर्टस महाविद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांनी हिरवी झेंडी दाखवून वाकेथॉन रॅलीची सुरवात करण्यात आली. यामध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना वॉक ऑन राईट चा संदेश देत समुपदेशन व जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप वर्ध्यात बुधवार 14 फेब्रुवारी रोजी उप प्रादेशिक परिवहन…
शरद पवार गटातील ओबीसी नेते अजित पवार गटात वर्धा : वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा घेतल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने हिंगणघाट येथील शरद पवार गटाचे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष हरीश काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचारांवर प्रेरित होऊन माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचे नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी मोहिते यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी वर्धा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष आशिष ठाकरे, युवक अध्यक्ष मयुर डफळे, देवीलाल जयस्वाल, शहर अध्यक्ष राकेश मंशानी प्रामुख्याने उपस्थित होते. हरीश काळे तसेच त्यांचे…
हिंगणघाट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट डॉक्टर उमेश वावरे यांनी केली बांधावर जाऊन पिक पाहणी वर्धा (ब्युरो) : हिंगणघाट तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस गारपिटीचा तडाखा शेतीच्या पिकांना बसला. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक हिरावून नेले. शेतकऱ्यांची व्यथा गारपिटीने पुन्हा वाढविली. एकीकडे हमीभावात शेतमाल खरेदी होत नसल्याची ओरड होत आहे तर दुसरीकडे गारपिटीने शेतकरी चिंतेत आला आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा समजून घेण्यासाठी बी आर एस पक्षाचे डॉक्टर उमेश वावरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. डॉ. उमेश वावरे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह सातेफळ शिवार गाठले. येथे पीक पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा डॉक्टर उमेश वावरे यांच्यासमोर मांडली. अजून पर्यंत शासनाचे कोणतेही कर्मचारी त्याच्या बांधावर आलेले…
वर्ध्यात १८ फेब्रुवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांची होणार सभा सभेसाठी वर्धेकरांमध्ये उत्सुकता.. वर्धा : वर्ध्यात १८ फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या स्वाभिमानी महा एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी वर्ध्यात स्थळांची चाचपणी केली जात होती, लोकमहाविद्यलय प्रांगण तसेच स्वावलंबी मैदान ही स्थळं सुचविली गेली होती. स्थळाबाबत बऱ्याच चाचपणी नंतर अखेर वर्ध्याच्या बोरगाव मेघे येथील गणेश नगर येथील क्रिकेट मैदान हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. येथे सुमारे एक लाख लोक जमतील अशी येथील व्यवस्था आसणार आहे. याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मनोज वरखेडे यांनी दिली आहे. वर्ध्याच्या शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीची जिल्हा आढावा बैठक आणि…

