Author: breakingvidarbha

26 दिवसाच्या उपोषणातून 25 गावांचा प्रश्न सुटला विदर्भ राज्य आघाडीकडून करण्यात आले उपोषण विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी दिला होता उपोषणाला पाठिंबा अखेर रेल्वे प्रशासनाला उपोषण आंदोलनाची घ्यावी लागली दखल रेल्वे थांब्यासाठी पाच वर्षापासून करण्यात आली विविध आंदोलने खासदार रामदास तडस यांनी ज्यूस पाजून सोडविले उपोषण आशिष इझनकर                                                                            वर्धा : वर्ध्याच्या सेलू तालुक्यात येणाऱ्या तुळजापूर (दहेगाव) येथे जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी नागरिक विदर्भ राज्य…

Read More

शिवनेरी मित्रपरिवराचे वतीने हिंगणी येथे जेष्ठ नागरिकांचा सत्कार वर्धा : गावात जेष्ठ नागरिकांचा सत्कार नियमित होणे गरजेचे असून यामुळे जेष्ठाचा उत्साह वाढेल, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेम निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात वाढ होईल. मी खेड्यातून शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून माझे हस्ते जेष्ठाचा सत्कार होताना मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे प्रतिपादान राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी केले. सेलू तालुक्याच्या हिंगणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील बाजार चौकात जेष्ठ नागरिक व उच्चशिक्षित युवकाच्या आई वडिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन हिंगणी येथील शिवनेरी मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आला होता.  कार्यक्रमाचे उद्घाटक…

Read More

अक्षरा भटारकर बेस्ट बॉक्सर अवॉर्डने सन्मानित खासदार क्रीडा महोत्सव वर्धा : वर्ध्याच्या खासदार क्रीडा महोत्सवात बॉक्सिंग स्पर्धेत मुलींच्या गटात अक्षरा दयानंद भटारकर ही बेस्ट बॉक्सर ठरली आहे. बॉक्सिंगच्या मुलीच्या गटात बेस्ट बॉक्सर म्हणून तिला अवॉर्ड मिळाला असून जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात तिला खासदार रामदास तडस यांच्या हस्ते अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. 15 वर्षीय अक्षरा हीने नियमित केलेला सराव आणि खेळाप्रति असलेली जिद्द खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी कामी पडली आहे. भविष्यात देखील सरावाच्या माध्यमातून जिल्हा तसेच राज्य स्तरावर स्पर्धा जिंकण्याचा मानस अक्षराने व्यक्त केला आहे. वर्ध्यात खासदार व क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. या खासदार क्रीडा महोत्सवाचे…

Read More

प्रफुल्ल फडके, महेश पाटील, डॉ. मोहन खडसे, किरण स्वामी, वैशाली चवरे ठरले पुरस्काराचे मानकरी राज्यातून चोवीसशे पत्रकारांनी नोंदविला स्पर्धेत सहभाग मुंबई (ब्युरो) : पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात येणारे व्हॉईस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड २०२३ ची घोषणा व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, कार्याध्यक्ष विश्वस्त योगेंद्र दोरकर, विश्वस्त प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी केली. ‘मुंबई चौफेर’चे संपादक प्रफुल्ल रघुवीर फडके यांना प्रथम क्रमांकाचा, साप्ताहिक सुस्वराज्य प्रभात सोलापूरचे संपादक महेश पाटील यांना द्वितीय क्रमांकाचा, तर अकोला येथील स्तंभलेखक, मुक्त पत्रकार डॉ. मोहन खडसे यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय प्रोत्साहनपर…

Read More

व्यापार्‍यांवर ईडीच्या धाडीचा नंबर  वर्ध्यातील महाएल्गार सभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा सत्ता हातात द्या आम्ही शेतकर्‍यांसाठी हमी कायदा करणार वर्धा  : राजकीय नेत्यांवर ईडीच्या धाडी झाल्या, विरोधकांवर ईडीच्या धाडी घातल्या गेल्या. आता व्यपाऱ्यांचा नंबर लागणार आहे. मी व्यापाऱ्यांना आगा करतो आहे नव्हे तर ही माझी चेतावणी आहे मोदींना तिसऱ्यांदा निवडून दिले तर व्यापाऱ्यांवर देखील धाडी पडतील. राजकारण्यांचा नंबर संपला आणि मोदींना तिसर्‍यांदा आणले तर पुढे तुमचा नंबर आहे. राजकीय नेते, उद्योगपतींची लाईन झाली की तुमची लाईन आहे. राजकीय नेत्यांचे झाले ते तुमचे होऊ द्यायचे नसेल तर भाजपला सत्ता येऊ देऊ नका ही दक्षता बाळगा, इशारा देत असे आवाहन वंचित…

Read More

वर्ध्यात छत्रपतीं शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती पुतळ्याला अभिवादन वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराजाना अभिवादन वर्धा: वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहेय. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन केले गेले. सर्वसामान्य नागरिकांसह अधिकारी, आणि राजकीय नेते येथे पोहचत अभिवादन करीत आहे. शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज वर्ध्यात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

Read More

ओबीसींच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का हा संविधानाचा अपमान आहे ओबीसी हक्क सभेचे मत न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी वर्धेत ऐकवटले ओबीसी बांधव वर्धा : वर्धा लोकसभा क्षेत्राची ओबिसी हक्क सभा स्थानिक महात्मा लॉन, नालवाडी येथे संपन्न झाली. या सभेत चर्चा व मार्गदर्शनात ओबिसी प्रवर्गात देशात 3700 तर महाराष्ट्रात 360 जातींचा सहभाग आहे. मुस्लीम 36 जाती व परिवर्तीत सर्व ख्रिस्श्चन जाती ओबीसीत सहभागी आहेत. राज्य व केंद्र सरकारने मागील अनेक वर्ष ओबिसी समाजाची दिशाभूल करून त्यांच्या न्याय्य हक्कांशी खेळ केला आहे.  मुख्य प्रश्नावरून ध्यान भरकटवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. सतत दोन समाजात , दोन प्रवर्गात भांडण जुंपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  यात मोठ्या प्रमाणात…

Read More

वर्ध्यात होणार शिवछत्रपतींचा जयघोष छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रपरिवार यांचा उपक्रम वर्धा (ब्युरो) : वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाज महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. यासाठी पुतळ्याजवळ जय्यत तयारी करण्यात आली असून येथे छत्रपतींचा जीवनपट उकलणारा पोवाडा हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. येथे उभारण्यात आलेल्या किल्ला येथील खास आकर्षण आहे. सर्वसामान्य माणसाच्या जयघोषाने वर्ध्यात शिवछत्रपतीच्या इतिहासाचा जागर होणार आहे. रविवार 18 फेब्रुवारी रोजी जालना येथील शाहीर अरविंद घोगरे पाटील यांच्या आवाजात पोवाडा सादरीकरण होणार आहे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचा इतिहास उलगडणारा पोवाडा वर्धेकारांच्या पसंतीस उतरणारा आहे. शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शाहिरी…

Read More

गणेश नगर येथील मैदानावर उभारला जातोय भव्य मंच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी लागलेय कामाला सभास्थळी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर घेतली जातेय काळजी वर्ध्यात रविवारी वंचित करणार महाएल्गार वर्धा : वर्ध्यात रविवारी १८ फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या स्वाभिमानी महा एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी ठरलेल्या गणेश नगर येथील मैदानावर सभेची जय्यत तयारी केली जात आहे. उंच अशा भव्य स्टेजची उभारणी याठिकाणी करण्यात आली आहे. वर्ध्याच्या बोरगाव मेघे येथील गणेश नगर येथील क्रिकेट मैदान हे स्थळ सभेसाठी निश्चित झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज वरखेडे यांच्या नेतृत्वात सभेच्या जय्यत तयारीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते लगबगीने लागले आहे. सभेला…

Read More

सावंगी रुग्णालयातील अस्थिशल्यचिकित्सा विभाग शस्त्रक्रियेद्वारे जीवघेण्या दुखण्यातून युवकाची मुक्तता वर्धा:  मानेच्या दोन मणक्यांमधील क्षतिग्रस्त डिस्क अर्थात गादी काढून संपूर्ण कृत्रिम डिस्कचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अस्थिरोग विभागात प्रथमच करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे मणक्यांच्या तज्ज्ञ शल्यचिकित्सकांनी पस्तीस वर्षीय तरुणाची जीवघेण्या मानदुखीसह चालताना होणाऱ्या त्रासातूनही मुक्तता केली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील निवासी उमेश जयस्वाल (३५) याला मानेच्या वरील व खालील भागात असह्य वेदना होण्यासोबतच हातापायाला मुंग्या येण्याचा व मान बधिर होण्याचा त्रास गत वर्षभरापासून सुरू होता. मागील चार महिन्यांपासून त्याला चालताना हा त्रास अधिक प्रकर्षाने जाणवायला लागला. या त्रासाचा परिणाम दैनंदिन जीवनशैलीवर आणि कामावर होत असल्याने…

Read More