Author: breakingvidarbha

पुलगाव येथे ठाकरे गटाकडून बसची तोडफोड करीत केला निषेध वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव सह विविध ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचा शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे गटाकडून निषेध नोंदविण्यात आला आहे. बुधवारी रात्री दरम्यान  वर्धेच्या पुलगाव येथे ठाकरे गटाकडून बसची तोडफोड करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आशिष पांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली.  दगडफेक करत  ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. पुलगावच्या स्टेशन चौक परिसरात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले गेले.बसला थांबवत त्यावर दगडफेक करन्यात आली.  बसच्या तोडफोडीनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते घटनास्थळावरून पसार झाले.  घटनेनंतर पुलगावच्या स्टेशन चौक परिसरात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली…

Read More

वाहन चालविणाऱ्यांना पुष्पहार घालत आंदोलकांची गांधीगिरी  वर्धा : वर्ध्यात तुळजापूर – नागपूर मार्गावर चालक संघटनानी एकत्र येत हिट अँड रण कायद्याच्या विरोधात आंदोलन केले.  हिट अँड रण कायद्याला विरोध करण्यासाठी वाहन चालक वर्ध्यात एकत्र आले होते. जी वाहने रस्त्यावर धावत होती ती वाहने अडवून चालकांना पुष्पहार घालण्यात आले. हिट अँड रण कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा! असे आवाहन वाहन चालक संघटनांकडून यावेळी करण्यात आले. वर्धा शहराच्या बाहेरून जाणारा तुळजापूर – नागपूर महामार्गावर पाच ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले आहे. सकाळी पवनार नजीक वाहन चालकांनी एकत्र येत रस्त्याने जाणाऱ्या गाड्या थांबविल्या व तेथे निदर्शने केली. त्यानंतर साटोडा चौक,  शांती नगर,…

Read More

 ट्रायकोकार्ड व पिवळे चिकट सापळे वर्धा : सेंद्रिय शेतीमध्ये ट्रायकोकार्ड व पिवळे चिकट सापळे पिकांवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी ट्रायकोकार्ड व पिवळे चिकट सापळे बनविण्याच्या प्रशिक्षणातून तांत्रिक माहिती घेऊन ट्रायकोकार्ड व पिवळे चिकट सापळे शेतकऱ्यांनी उत्पादित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे जिल्हा नियोजन समिती व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ट्रायकोकार्ड व पिवळे चिकट सापळे बनविण्याचे तंत्रज्ञान या विषयावर सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, प्रशिक्षणाच्या उद्घाटनवेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जीवन कतोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी…

Read More

महसूल सेवांचे वनस्टॅाप सोल्यूशन जिल्हा प्रशासनाचा नाविन्यपुर्ण उपक्रम पालकमंत्र्यांच्याहस्ते सेवा केंद्राचे उद्घाटन Wardha – आशिष इझनकर वर्धा : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते महसूल प्रशासनाने तयार केलेल्या आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. 100 पेक्षा जास्त सेवा याठिकाणी उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून हे आगळे वेगळे सेवा केंद्र साकारण्यात आले आहे. केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खा.रामदास तडस, आ.डॉ.पंकज भोयर आ.दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नूरुल हसन, जिल्हा प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी राजेश भगत, तहसीलदार राजेश कोळपे उपस्थित होते. एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी…

Read More

वर्धा: सर्वसामान्य होतकरू युवक व नागरिकांकरीता स्टार्टअप व नाविन्यपूर्ण उद्योग यांना प्रोत्साहन मिळावे तसेच जिल्ह्यात नवउद्योजक निर्माण व्हावे याकरिता वर्धा येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून इंक्युबेशन व बिझनेस फॅसिलिटी सेंटर उभे राहणार आहे. यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भारतीय प्रबंधन संस्था व जिल्हा प्रशासन यांच्यात सामजंस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराप्रसंगी पालकमंत्र्यांसह खा.रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, आ.रणजित कांबळे, आ.डॅा.पंकज भोयर, आ.समीर कुणावार, आ.दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, भारतीय प्रबंधन संस्थेचे संचालक भिमराया मेत्री तसेच शिवाजी धवड व कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या सहाय्यक संचालक निता औघड उपस्थित होत्या. वर्धा येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या परिसरात कौशल्य…

Read More

शिक्षण मित्र’ विद्यार्थी, शिक्षक, पालकांना देणार गतिमान सेवा वर्धा : विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत शिक्षण विभागाच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाने ‘शिक्षण मित्र’ नावाचा नाविन्यपुर्ण उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला लोकसेवा हमी कायद्याची जोड देण्यात आली असून विविध प्रकारच्या 20 सेवा या उपक्रमाद्वारे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा वर्धा पहिलाच जिल्हा आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे न झिजवता शासकीय सेवा त्यांना कमी वेळेत आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने लोकसेवा हमी कायदा आणला आहे. या कायद्यांतर्गत…

Read More

वर्धा : सेलू तालुक्यातील महाभारतकालीन एकचक्री नगर असलेल्या केळझर येथील बुद्धविहार परिसरात पुरातन पाषाणाची मूर्ती आढळून आली आहे. तुळजापूर – नागपूर मार्गावर असलेल्या बुद्ध विहार परिसरात ही मूर्ती आढळून आली आहे. परिसरातील शेतामध्ये शेळ्या चारणाऱ्या गुराख्याच्या निदर्शनास ही मुर्ती आली. अधिक खोदकाम केल्यावर ही मुर्ती बाहेर काढण्यात आली आहे. पुरातत्व विभागाच्या निरीक्षणानंतर मुर्ती गुरुवारी नागपूर येथे हलविण्यात आली आहे. 44 सेंटिमीटर जाडी आणि साडेचार फूट उंच असलेली ही मूर्ती यादवकालीन 13 व्या शतकातील असल्याचे पुरातत्व विभागाची माहिती आहे. अखंड पाषाणात चारही बाजूने या मुर्तीचे कोरीवकाम करण्यात आले आहे. ऐतिहासिक मुर्ती असून जैन धर्मातील तिर्थकार वृषभपंत महाराजांची ही मूर्ती असल्याची…

Read More

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसाव्या दिवशी जेलभार राज्यव्यापी संप सुरूच; मोर्चा काढून केले जेलभरो आंदोलन – अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गेल्या तीस  दिवसापासून राज्यव्यापी संप सुरू आहे. आज संपाच्या तिसाव्या दिवशी अंगणवाडी सेविकांनी वर्ध्यात मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले. आयटक व सीटू या दोन संघटनांच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध घोषणा देत पोलीस ठाणे गाठले. हजारोच्या संख्येत पोलीस ठाण्यात पोहचलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहेय.  वेतन वेळेत करा, शासकीय सेवेत सामावून घ्या, दरमहा पेन्शन सुरू करा, आजारपणाच्या रजा मंजूर करा, यासह विविध मागण्यासाठी हे जेलभरो आंदोलन करण्यात आलेय.  जेल भरो आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलाय.

Read More

उबाठा गटाच्या नवनियुक्त संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत काही जणांनी दिले राजीनामे वर्धा:  वर्ध्याच्या देवळी येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समूहिक राजीनामे दिल्याने खळबळ उडालीय. नवनियुक्त संपर्क प्रमुखाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करीत हे राजीनामे देण्यात आले आहे. दिलेले राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मेलद्वारे पाठविले जाणार असल्याची पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. नवनियुक्त संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवरून अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठीच हे राजीनामानाट्य असल्याची चर्चा आहे.

Read More

अंगणवाडी सेविकांनी संपाच्या 25 व्या दिवशी हातात फिरविली चटणी भाकर वर्धा : वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयटक आणि सिटू च्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर चटणी भाकर आंदोलन करून समस्यांकडे लक्ष वेधले आहे.  राज्यात गेल्या पंचवीस दिवसापासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहे . वर्ध्यात जिल्हा परिषद समोर देखील पंचवीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे. वेतनश्रेणी, ग्रॅच्युटी, निर्वाह  भत्ता या मागण्या आंदोलनातून करण्यात येत आहे. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविकानी घरून चटणी भाकर आणली आणि आंदोलनात ती हातात घेऊन आंदोलन केले आहे. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. शेकडो अंगणवाडी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.

Read More