Author: breakingvidarbha

वर्ध्याच्या सेवाग्राम येथे सात दिवसांपासून  अनोखे आंदोलन सुरू  सेवाग्राम विकास आराखड्यातून मूळ सेवाग्राम गावाचा विकास केला नाही वर्धा : 244 कोटी रुपये खर्च करून सेवाग्राम विकास आराखडा राबविला जात आहे. सेवाग्राम येथे आश्रम परिसरात पायाभूत सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकास होत आहे, पण ज्या मूळ जुन्या गावात सेवाग्राम येथे महात्मा गांधी पहिल्यांदा आले त्या गावाचा विकास होत नाही. सेवाग्राम विकास आराखड्यात गावासाठी पैसे नसतील तर आपण आपले अवयव विकून निधी द्यायला तयार असल्याचा मचकूर पोस्टरवरून मांडत एका गावकऱ्याने सेवाग्राम आश्रमाच्या समोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.    गावाच्या विकासासाठी…

Read More

नाशिक व अमरावती आयुक्तांकडून उपक्रमाची पाहणी सेवादूत प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना घरी प्रमाणपत्र वितरण वर्धा: सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत अधिसूचित सेवा उपलब्ध झाल्या पाहिजे, यासाठी सेवा हमी कायदा अस्तित्वात आला आहे. यापुढे जावून आपणास नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध करून द्यावयाच्या आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाने त्या अनुषंगाने सुरु केलेला ‘सेवादूत’ हा प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे. संपुर्ण राज्यभर हा उपक्रम राबविण्यासारखा आहे, असे नाशिक व अमरावती विभागाच्या राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सेवादूत’ या प्रकल्पांतर्गत नागरिकांना 34 प्रकारच्या शासकीय सेवा घरपोच दिल्या जातात. या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी नाशिक विभागाच्या राज्य लोकसेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी व अमरावती विभागाचे…

Read More

विषारी औषधाने झालाय मोरांचा मृत्यू वन विभाग आरोपीच्या शोधात वर्धा  : मदनी शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात अकरा मोर मृतावस्थेत आढळले आहे. विषारी औषधामुळे हा मृत्यू झाल्याची बाब वन विभागाच्या तपासात समोर आली आहे. दहा छोटे तर एक मोठा मोर असे एकूण अकरा मोर मृतावस्थेत आढळून आले. मदनी येथील गजानन कुबडे यांचे मदनी शिवारात शेत आहे. याच परिसरात झुडपी जंगल आहे. येथे वन्य प्राण्यांचा देखील हैदोस नेहमीच असतो. मंगळवारी सकाळी शेतकरी गजानन कुबडे यांच्या शेतात मोर मृत अवस्थेत आढळून आले. एक मोठा तर दहा छोटे पक्षी असल्याने याची माहिती वन विभागाला देण्यात आली. मोठ्या संख्येत मोर मृत आढळल्याने संशय बळावला. नेमका…

Read More

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध पुणे : राज्य शासनाच्यावतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात; आगामी काळातही पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल इलेव्हन २३ येथे आयोजित ‘पुणे अचिव्हर्स २०२३’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, माजी आमदार विलास लांडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, , संघटक संजयजी भोकरे,…

Read More

कारंजा येथे शेतातील फार्म हाऊसवर दरोडा शेतकऱ्याला चाकूने भोसकले 55 पोती आणि दागिने केले लंपास वर्धा : कारंजा तालुक्यातील वाघोडा येथे रात्रीत फार्म हाऊसवर मोठा दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. येथे नागपूर येथील गोपाल पालिवाल या शेतकऱ्याचे फार्म हाऊस आहे. मध्यरात्री सात ते आठच्या संख्येत आलेल्या दरोडेखोरांनी शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखविला. दरोडा घालत 55 पोते सोयाबीन,सोन्याचे दागिने लुटून फार्म हाऊसवरील प्रतिकार करणाऱ्या एकाच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकून गंभीर जखमी केले. नागपूर येथील नारायण पालिवाल यांचे वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील शेतात फार्महाऊस आहे, आठवड्यातून एकदा ते या फार्महाऊस वर येत असतात. त्यांचे पीक व शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊस वर…

Read More

निष्ठा यात्रेतून शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांच्या समस्याना फोडणार वाचा वर्धा – वर्ध्यात निष्ठावंत शिव सैनिकांकडून निष्ठा यात्रा काढण्यात आली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी शनिवारी वर्ध्यातून शिवसैनिकांनी ही निष्ठा यात्रा काढली आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांनी या यात्रेचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या यात्रेला सुरवात करण्यात आली. सायकलने ही यात्रा समोर जात मुंबई येथे मातोश्री वर पोहचणार आहे, सायकलवर लक्ष वेधून घेणाऱ्या राज्यातील समस्यांचा मचकूर टाकण्यात आला असून ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशी टीका देखील करण्यात आली आहे. शेकडो शिवसैनिक या यात्रेत सहभागी झाले असून नऊ दिवसात…

Read More

शासन सकारात्मक : तीन आमदारांनी मांडले पत्रकारांचे प्रश्न २६ आमदारांनी दिल्या उपोषणस्थळी भेटी. नागपूर : अवघ्या तीन वर्षांत देशात नंबर एक ठरलेली आणि ३८ हजार सदस्य, पदाधिकारी असलेली व्हाॅईस ऑफ मीडिया ही संघटना गेले अनेक महिने आपल्या हक्काच्या मागण्यांचा सक्षमपणे पाठपुरावा करीत आहे. त्या मागण्या नागपूरच्या अधिवेशनात अनेक आमदारांनी मांडल्या. आमदार संजय गायकवाड, सत्यजित तांबे व दीपक चव्हाण यांनी शासनाचे लक्ष वेधले. हे व्हाॅईस ऑफ मीडियाने तीन दिवस केलेल्या लाक्षणिक उपोषणाचे फलित मानले जात आहे. नागपूरला उपोषणाच्या ठिकाणी २६ आमदारांनी भेटी दिल्या. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड हे पत्रकारांच्या समस्यांबाबत जागरूक आहेत. त्या सुटल्या पाहिजेत, पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे, ही…

Read More

नवयुवक व नवयुतीसाठी 8 ते 17 जानेवारी या कालावधीत प्रशिक्षण सत्र आयोजित वर्धा : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परिक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुतीसाठी 8 ते 17 जानेवारी या कालावधीत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निवास,भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी ही संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात बुधवार दि.3 जानेवारी रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर SSB-56 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेलल्या परिशिष्ट पुर्ण…

Read More

आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक वर्धा : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियय 2017 च्या कलम 36 क नुसार दुकाने, आस्थापनांना आपले नामफलक मराठी भाषेत लिहीणे आवश्यक आहे. मराठी भाषेत नामफलक न लावल्यास कायदेशीर कारवाईस आस्थापना मालकांना समोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 च्या कलम 36 क मधील तरतुदी नुसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक, देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक आहे. देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरीक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक असू शकतील पंरतू मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरूवातीला लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील अक्षरांचा टंक, आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षराचा टंक, आकारापेक्षा लहान…

Read More

आरोग्य संकल्प अभियानातून साडेतीन हजार रुग्णांची आरोग्य तपासणी      वर्धा – रुग्णालये ही रुग्णांच्या आरोग्यसेवेसाठी असतात, ती नफा कमविण्यासाठी नाहीत. त्यामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून आम्ही आमच्या रुग्णालयांकडे बघत नाही, असे उद्गार दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी काढले. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाद्वारे सेलू येथे आयोजित मोफत आरोग्य सेवा महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दीपचंद चौधरी विद्यालयाच्या विस्तीर्ण परिसरात आयोजित या शिबिराचा सेलू परिसरातील साडेतीन हजाराहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. मेघे उच्च शिक्षण संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांच्याकडून वर्धा सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य संकल्प अभियानांतर्गत या…

Read More