Author: breakingvidarbha

अखेर वैद्यकीय महाविद्यालयचा मार्ग मोकळा हिंगणघाट -आर्वीतही मिळणार सुविधा वर्धा : राज्य शासनाने वैद्यकीय महाविद्यालय जाहीर केल्या नंतर सर्वात प्रथम आर्वीचा विचार करण्यात आला होता. मात्र, हिंगणघाट येथील दबाब वाढत गेला. दरम्यान, सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध संघटनानी निवेदन देऊन आर्वीची गरज लक्षत आणून दिली होती. अखेर, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुवर्णंमध्य साधून हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करायला हिरवी झेंडी दाखवली तर तळेगाव श्यामजीपंत येथेही जागतिक बँकेच्या सोबत महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार PPP तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात येईल, असे आज विधानसभेत जाहीर केले. विधानसभेत निवेदन करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की…

Read More

वर्धा : वर्धा शहरात जिल्ह्यातील पहिले पत्रकार भवन उभारले जावे यासाठी व्हाईस ऑफ मीडिया गेल्या काही वर्षापासून सतत पाठपुरावा करीत आहे. वर्ध्यात पत्रकार भवनाची उभारणी व्हावी यासाठी मंगळवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन स्थळी वनमंत्री तसेच वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. लवकरच पत्रकार भवन वर्ध्यात उभारले जाणार असल्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले आहे. वर्धा शहराला तसेच जिल्ह्याला आचार्य विनोबा भावे , महात्मा गांधी यांच्यासह अनेक लेखक, साहित्यिक आणि विचारवंतांच्या पत्रकारितेचा वारसा आहे. महाराष्ट्र राज्यातील असंख्य जिल्ह्यामध्ये पत्रकार भवन उभारले गेले आहे. पण अद्याप वर्धा जिल्ह्यात पत्रकार भवन नाही. गेल्या काही वर्षात पत्रकार भवन उभारणीसाठी पाठपुरावा केला जात आहे.…

Read More

वर्धा: शेतकरी उत्पन्न वाढविण्याकरिता सिंचनाची सोय करीत असतो. त्यासाठी बरेच शेतकरी गावतलावातून पाण्याची उचल करतात. परंतु तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तलावाची साठवणूक क्षमता कमी होऊन सिंचनाचा प्रश्न निर्माण होतो. हीच बाब लक्षात घेवून जमनालाल बजाज सेवा ट्रस्टने लोकसहभागातून तलाव गाळमुक्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यातूनच कारंजा (घाडगे) तालुक्यातील सिर्शी-मोर्शी येथील तलाव गाळमुक्त करण्याचे काम सुरु केले असून त्याचा चार गावांना फायदा होणार आहे. कारंजा (घाडगे) तालुक्यातील सार्शी-मोर्शी ग्रामपंचायत अंतर्गत एक तलाव आहे. या तलावाच्या पाण्याचा सार्शी-मोर्शीसह हेटीकुंडी, ठाणेगाव व खरसखांडा या गावांना आणि येथील शेतकऱ्यांना फायदा होतो. या तलावातून आताही शेतकरी सिंचनाकरिता पाण्याची उचल करतात. या तलावात गाळ…

Read More

वर्धा : गावात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पिठाला आटा चक्कीमधून दळून आणलं जातं. पण हेच दळण गावकऱ्यांना वर्षभर मोफत मिळत असेल तर पर्वणीच म्हणावी लागेल. गावाला निशुल्क दळण दळून मिळण्याची ही संधी मनसावळी या वर्धा जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावकऱ्यांना मोफत दळण दळून जर पाहिजे असेल तर मात्र ग्राम पंचायतीला शंभर टक्के कर भरणा करणे अत्यावश्यक आहे. या अटीवरच गावात ग्राम पंचायतने पुढाकार घेऊन उभारलेल्या आटा चक्कीवर मोफत दळण दिले जात आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी कर रुपात उभा केला जातो पण अलीकडे कर भरण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने मनसावळी ग्राम पंचायतीने शंभर टक्के कर भरा आणि वर्षभर…

Read More

वर्धा : उन्हाळ्याच्या सुरुवतीलाच हिंगणघाट येथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगणघाटच्या अनेक भागात पाणीटंचाई आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढून नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. कोट्यवधी रूपयांचा खर्च करून योजना तयार झाल्या. योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्यानेच पाणी मिळत नाही, हिंगणघाट शहरात अमृत योजना झाली असतानाही पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. 365 दिवसाचा कर घेत असताना वर्षातून केवळ 140 दिवसच पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस सह शहरातील नागरिकांनी केला आहे. शहरात निर्माण करण्यात आलेल्या 11 पाण्याच्या टाक्यामधून पाणी पुरवठा होत नाही. टाक्या अजूनही कोरड्या असल्याचे मोर्चातून प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिंगणघाट…

Read More

वर्धा : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या अपमानकारक विधानाचा निषेध करण्यासाठी भाजप एकवटली आहे. हिंगणघाट शहरात निघालेल्या सावरकर गौरव यात्रेत आमदार समीर कुणावार यांच्या जोडीला खुद्द काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी उद्योग राज्यमंत्री उभे राहिले. दोन्ही नेते यात्रेत पायदळ चालताना नागरिकांच्या भेटी घेत होते. दरम्यान गोकुलधाम मैदानावर झालेल्या सभेत आमदार समीर कुणावार चांगलेच कडाडले. राहुल गांधी यांनी सावरकरांचा पुन्हा अपमान केला तर अख्खा महाराष्ट्र विरोधासाठी उभा ठाकेल, असाच बुलंद आवाजातील इशारा आमदार कुणावार यांच्या भाषणात होता. समीर कुणावार यांनी सावरकर यांच्या पुस्तकांचे आजच्या पिढीने अध्ययन करावे असे आवाहन केले आहे. कृषी उत्पन्न बाजार…

Read More

वर्धा : विविध कारणांमुळे दिड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहेय.वर्ध्याच्या सात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वर्ध्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी बाजार समित्यांवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपने देखील मैदानात उतरण्याची तयारी केली आहे तर काँग्रेसही बाजार समितीवर डोळा ठेऊन आहे. पण तिन्ही राजकीय पक्षात असणाऱ्या गटा-तटाच्या राजकारणामुळे हिंगणघाट, आर्वी, सिंदी रेल्वे, वर्धा, आर्वी , आष्टी आणि समुद्रपूर या बाजार समित्यांवर वर्चस्वाची लढत सुरू झाली आहेय. येथे एकूण 475 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. वर्ध्यात सात बाजार समित्यांच्या…

Read More

वर्धा :  तहसील कार्यालय हिंगणघाट येथे संजय गांधी निराधार समितीची प्रथम बैठक आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर ही प्रथमच बैठक असल्याने याला विशेष महत्त्व आहे, यावेळी आमदार कुणावार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, समाजातील तळागाळातील सर्वसामान्य निराधार नागरीकांना योजनेचा लाभ मिळावा. या लाभापासून कुठलाही निराधार वंचित राहू नये यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. निराधार लाभार्थींच्या मानधनामध्ये दोनदा वाढ झाली असून दोन्हीदा ही वाढ उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीच केली हे विशेष या आहे. या वेळी नवनियुक्त सदस्य गंगाधरराव कोल्हे, आकाश पोहाणे, शंकरराव मुंजेवार, शंकर मोरे, श्रीमती नलिनी सयाम,रजनी राईकवार,…

Read More

वर्धा : समृद्धीच्या महामार्गावर मूक प्राण्यांचा जीव जाणे ही आता नेहमीची बाब झाली आहे. माणसांसाठी वेळेची बचत करणारा समृद्धी महामार्ग मात्र मुक्या प्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. अश्याच एका घटनेत वर्ध्यालगत पहाटे येळाकेळी जवळ महामार्ग ओलांडत असताना वानराच्या कडपातील मादी वानराला वेगात येणाऱ्या गाडीची जोरदार धडक लागली. आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसणाऱ्या या आईने मात्र आपल्या पिल्लाला क्षणात आपल्यापासून दूर फेकले. स्वतः मृत्यूशी झुंज देणाऱ्या मादी वानराच्या या आकांताला पाहून याच मार्गावर ओडिशावरून नाशिकला जाणाऱ्या ऍबुलन्सच्या कर्मचाऱ्यांना हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे ठरले. ऍम्बुलन्स मधील कर्मचारी किशोर सूर्यवंशी आणि विक्की पठाण यांनी लगेच नजीकच असलेल्या येळाकेळी येथील टोल नाक्याशी संपर्क साधला. लगेच…

Read More

वर्धा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जात आहे. या प्रकल्पातून सामुहिक व वैयक्तिक लाभाच्या योजना देखील राबविल्या जातात. सेलू तालुक्यातील शिवणगाव येथील एका महिलेने यातील वैयक्तिक लाभाच्या योजनेचा फायदा घेत आपला स्वत:चा बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरु केला. या व्यवसायातून या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. शेळीपालनाचा व्यवसाय आत्मविश्वासाने सुरु करण्याऱ्या या महिलेचे नाव प्रतिभा नंदकिशोर गेडाम असे आहे. भुमीहीन असतांना देखील न डगमगता त्यांनी हिमतीने आपल्या शेळीपालनात भरारी घेतली आहे. कृषी संजीवनी प्रकल्पात महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रकल्प गावामध्ये महिला कृषि मित्र म्हणजे कृषी ताईंची नेमणूक करण्यात आली आहे. शिवणगावच्या कृषी ताई…

Read More