- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Author: breakingvidarbha
वर्धा – विशेष व्यक्तींमध्येही उत्तुंग प्रतिभा असल्याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती आहे. त्यामुळेच अशा बालकांची प्रतिभा ओळखून पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना योग्य प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सावंगी येथे आयोजित इंद्रधनुष्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ आणि जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दत्ता मेघे सभागृहात आयोजित या उद्घाटन समारोहाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. नूरुल हसन, श्रीमती प्रियांका कर्डिले, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, अभिमत विद्यापीठाचे प्रकुलगुरू डाॅ. गौरव मिश्रा तसेच आचार्य विनोबा भावे…
वर्धा – बारा तास वीज मिळावी यासाठी शेतकरी सतत प्रयत्न करीत असताना वर्धा जिल्ह्यात मात्र अजूनही दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळणे कठीण झाले आहे. दिवसाची बारा तास वीज मिळण्यापासून शेतकरी वंचित असताना वर्ध्याचे पालकमंत्री, तथा ऊर्जामंत्री नेमके करतात तरी काय? असाच सवाल माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तानपुरे यांनी केला आहे. वर्ध्याच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसाणीमुळे शेतकऱ्यांकडून विजेची बिले देखील भरणे शक्य झाली नाही. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले पाहिजे, जिल्ह्यात…
वर्धा – येत्या काही दिवसात हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाची पाहणी केली. नागपूर ते शिर्डी असा प्रवास करीत असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वर्ध्यातून पुढे सरकले. यावेळी मुख्यमंत्री बसून असलेल्या गाडीचे स्टेअरिंग मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात होते. नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गात प्रवास करत मार्गाची पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन चालविले. वर्धा…
सांगली : सांगलीतील कुपवाड परिसरामध्ये चुकून आलेल्या सांबर जातीच्या प्राण्याला पकडण्याचे वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी गेले चाळीस तासाहून अधिक हे सांबर पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाकडून केले जात आहे. शुक्रवारी सकाळी एक सांबर कुपवाड परिसरामध्ये आल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाने आपली सर्व यंत्रणा गतिमान केली होती. हे सांबर नागरी वस्तीत जाऊ नये व त्याला सुरक्षित पकडण्यासाठी वेगळ्या ठिकाणी ट्रॅप सुद्धा लावण्यात आले होते, मात्र ते सांबर हाती येत नव्हते. शनिवारी दिवसभरात सुद्धा वन विभागाने प्राणी मित्रांच्या मदतीने हे सांबर पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले होते. भारत सूतगिरणीचे आवारामध्ये बंदिस्त कंपाउंड मध्ये…
वर्धा – हिंगणघाट येथील दालमीलमध्ये काम सुरू असताना डाळीच्या हौदात कामगाराचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर दालमिल मालकाने पोलिसांना व त्याच्या नातेवाईकांना सूचना न देताच परस्पर त्या कामगाराच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहे. सदर घटना बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. पोलिसांकडे नातेवाईकांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून कंपनीचा मालक फरार झाला आहे. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील अमृतनगर येथील 16 वर्षीय कामगार प्रभाशकुमार यादव हा हिंगणघाट येथे मानधनिया इंडस्ट्रीज दलमीलमध्ये कार्यरत होता. गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत असणाऱ्या या कामगाराने नेहमीप्रमाणे आपले काम बुधवारी सुरू केले. रात्री 9 वाजताच्या सुमारास प्रभाश दालमील मधील डाळीच्या हौदात उतरला. याच हौदातील डाळ बाहेर निघणाऱ्या…
वर्धा – मानवी देह मृत झाल्यावरच त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना आपण समाजात पाहिले आहे. पण हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे मात्र गोपालकाने आपल्या गाईच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करीत पशुप्रेम दाखविले आहे. तब्बल तीस वर्षांपासून जोपासना करीत असलेल्या गाईचा मृत्यू झाला. गाईच्या मृत्यूनंतर तिच्यावर मानवी देहाप्रमाणेच अंतिम संस्कार करण्यात आले आहे. बऱ्याचदा पशुपालकांकडून गुरं कसायला विकण्यासारख्या घटना घडतात. पण अशा घटनांना थांबविण्याची प्रेरणा देणारी घटना अजनसरा गावात घडली आहे. आजनसरा येथील शेतकरी नामदेवराव हुलके यांनी गोपालकाचं गोमातेविषयी असलेले अनोखे नाते व्यक्त केले आहे. गेल्या तीस वर्षांपासून सांभाळत असलेल्या ‘पार्वती’ नामक गोमातेला अखेरचा निरोप देताना मात्र त्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या घरच्या सदस्याप्रमाणे त्यांनी…
अमरावती – वर्ध्याच्या आष्टी( शहीद ) तालुक्यातील थार गावातील शेतमजूर दीपक अभिमान कुळमेथे वय 31 राहणार थार हा युवक 28 नोव्हेबर रोजी थार गावातून अमरावतीच्या नांदगाव पेठ येथील एमआयडीसी परिसरात काम करण्यासाठी गेला होता. दिनांक 29 रोजी नांदगाव पेठ येथील एमआयडीसी परिसरातल्या खांबावर रंगकाम करण्यासाठी तो चढला होता. रंगकाम करीत असताना झुल्याची हुक अचानक तुटली आणि तो जमिनीवर पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सविस्तर असे की, आष्टी तालुक्यातील थार येथील शेतमजूर युवक आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मजुरीच्या कामाने अमरावती येथील कंत्राटदाराकडे गेला होता. सोमवारी गेल्यावर त्याने रात्रभर मुक्काम केला. दिनांक 29 रोजी कंत्राटदाराने सांगितलेल्या प्रमाणे कामावर हजर झाला. एमआयडीसी परिसरात…
वर्धा : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दि. ३, ४ व ५ फेब्रुवारी रोजी आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझल कट्टा अर्थात मराठी गझल मुशायरा संमेलनाची रंगत वाढविणार आहे. विदर्भ ही मराठी गझलेची भूमी मानली जात असून संमेलनात आयोजित या तीन दिवसीय मुशायऱ्यात नव्याजुन्या पिढीतील गझलकारांना सहभागी होता येईल. गझलकारांनी दि. २५ डिसेंबरपर्यंत स्वरचित गझल संक्षिप्त परिचयासह पाठविण्याचे आवाहन संमेलन संयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे. या गझल मुशायऱ्यात सहभागी होण्याकरिता गझलकारांनी पाठवलेली रचना गझलेच्या निकषांनुसारच असावी. राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोख्याचा भंग होणार नाही, अशी गझल सादर करणे अपेक्षित असून सादरीकरणासाठी पाच मिनिटे दिली जातील. गझलकारांनी gazalkatta96wardha@gmail.com या मेलवर स्वतःचा पत्ता,…
Agri Special # : वर्धा (विशेष प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी भरघोस उत्पन्नाचे साधन म्हणून पॉलिहाऊस आणि शेडनेटचा गाजावाजा करण्यात आला. लाखोंच्या सवलतीचे आमीष दाखविले गेले. चाचणीतच अपयशी ठरले असतानाही विदर्भात प्रयोग राबविण्यात आला. अनेक शेतकऱ्यांना या तंत्रशुद्ध शेतीतून साधे उत्पादन खर्चही काढता आले नाही. लाखो रुपयांचे कर्ज थकल्याने शेतकरी अडचणीत सापडले. नेत्यांकडे दाद मागितली तरीही प्रश्न सुटला नाही. आता ३० नोव्हेंबरला या शेतकऱ्यांच्या गहाण मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. कृषी विभागाच्या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमार्फत हायटेक शेतीकरण्यासाठी पॉलिहाऊस आणि शेडनेट उभारणी प्रकल्प राज्यात राबविण्यात आला. राज्यात तब्बल १,२०० शेतकरी या प्रकल्पाचे लाभधारक आहेत. विदर्भातील ३०० शेतकऱ्यांचा समावेश आहे. या प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी विविध…
वर्धा – पिंकाना उध्वस्त करणाऱ्या जवळपास पन्नास जंगली रानडुक्करांच्या कळपातील नऊ रानडुक्कर पळता-पळता शेतातील विहिरीत पडले. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास सेलू तालुक्यातील केळझर परिसरात समोर आली. सदर रानडुक्करांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू करीत सुखरूप विहिरीच्या बाहेर काढत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. जंगली श्वापदे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके उध्वस्त करीत असून त्यांच्या हैदोसामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे उध्वस्त होणाऱ्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी रात्रभर जागली देखील करतात. परंतु वन्यप्राण्यांचे झुंडच्या झुंड शेतपिकांचे नुकसान करीत असून शेतकरी हतबल झाले आहेत. केळझर शिवारात सुदाम घवघवे यांची शेती आहे. जंगली रानडुक्करांनी त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील भेंडी, वांगी, कपाशी,…

