- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Author: breakingvidarbha
वर्धा : शेतीच्या बाजूला असलेल्या नाल्याला पावसाळ्यात येणारे पाणी शेतकर्यांसाठी नुकसानकारक ठरायचे. दरवर्षी नाल्याकाठची शेत जमीन खरडून पिकांचे नुकसान होत होते. ही बाब शेतकर्यांनी सरपंचांच्या माध्यमातून जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या निदर्शनास आणून दिली. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने लोक सहभागातून खोलीकरणाचा विडा उचलला. काही दिवसात काम पूर्ण झाले आणि नाला खोलीकरणामुळे शेतीशिवार पाणीदार झाले. सिंचनाच्या कोल्हापूरी बंधाऱ्याला चाळीस गेट बसवून पाणी थांबण्यास मदत झाली आहे. समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथे वाघाडी आणि शिंगाडी असे दोन नाले आहे. जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी या नाल्यावरती कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. पण त्यानंतर दोनच वर्षात बंधार्याच्या फळ्या गायब झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा बंधारा अडचणीचा झाला होता.…
वर्धा : जैवविविधतेने संपन्न असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात दुस-यांदा अस्वलांचे दोन दुर्मिळ ल्युसिस्टिक शावक त्यांच्या आईसोबत वनभ्रमंती करतांना आढळुन आले आहेत. वनरक्षक मोटार सायकलने कळमेट चेकपोस्ट कडे जात असतांना आमगाव चेकपोस्ट पासुन जवळपास २ किमी अंतरावर अचानकपणे एक काळ्या रंगाची अस्वल वनक्षेत्रातुन निघून डांबर रस्त्यावर येतांना दिसून आली. पाठोपाठ तपकिरी रंगाचे अंदाजे १ वर्ष वयाचे अस्वलीचे पिल्लू (शावक) रोडवर आले. लगेच पुन्हा एक तपकिरी रंगाचेच शावक रस्त्यावर येवुन आईचे पाठीमागे धावू लागले. काळ्या रंगाचे मादी अस्वल व तपकिरी रंगाचे दोन शावक दृष्टीस पडले आहे. यापूर्वी देखील सदर परिसरातच अडीच वर्ष वयाचे एक तपकिरी रंगाचे ल्युसिस्टीक स्लॉथ बिअर प्रथमत: आढळून आले…
वर्धा : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मार्फत नवं नियुक्त तालिका अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी हिंगणघाट मतदार संघाचे आमदार समीर कुणावार यांच्या नावाचा निर्वाचित तालिका अध्यक्षांच्या सूचित समावेश करण्यात आला. हिंगणघाट क्षेत्रातील आमदाराची तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या क्षेत्रात समस्या मांडण्यात मदत होणार आहे. तालिका अध्यक्ष हा बहुमान मिळाल्याने आमदार समीर कुणावार यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व सहकारी आमदारांचे आभार मानले. महाराष्ट्राच्या विधानसभेत तालिका अध्यक्षाला महत्वाचे स्थान आणि बहुमान असल्याने आमदार समीर कुणावार यांनी त्यांच्या मतदार संघाच उत्तम नेतृत्व केल्याने व त्यांच्या…
वर्धा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी, भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील तसेच भाजप प्रवक्ता सुधानशू त्रिवेदी यांनी केलेल्या महापुरुषांच्या विरोधी विधानाचा सोमवारी आर्वी येथे निषेध नोंदविण्यात आला. भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांकडून एकत्र येत येथे आर्वी बंद ची हाक देण्यात आली. मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. आर्वीकरांनी या बंदला मोठा प्रतिसाद दिला आहे. भाजप नेत्यांकडून सतत होत असलेल्या अपमाणकारक वक्तव्याने महाराष्ट्रात चुकीचा संदेश जात आहे. भाजप कडून होत असलेल्या या प्रकाराला आळा बसण्यासाठी आर्वी येथे सर्व राजकिय पक्ष एकत्र आले. माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली आर्वी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी…
वर्धा : स्वातंत्र्योत्तर काळात समाजात अनेक अमुलाग्र बदल झाले असून समाज सुधारकांसोबतच सामाजिक चळवळींनी निर्माण केलेल्या कार्याचे ते फलीत होय, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी स्थानिक कुमारप्पा येथे आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत केले. अभाअंनिसच्या स्थापनेला ४० वर्षे पूर्ण झाली असून चार दशकांचा आढावा घेण्यासोबतच आगामी धोरणांबाबत दिशा निश्चित करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत श्याम मानव यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत विविध उपक्रमांंच्या नियोजनाबाबत चर्चा केली. यावेळी अंनिसचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, युवा शाखा राज्य संघटक पंकज वंजारे, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, जिल्हा महिला संघटिका प्रा. डाॅ. सुचिता राऊत यांची…
रवी येनोरकर हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील हनुमान वॉर्ड, विरभगतसिंग व गौतम वॉर्ड येथील युवकांसह महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य अमोल बोरकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवकांनी पक्ष प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याने प्रभावित होऊन अनेक युवकांसह महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री तथा वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोध मोहिते होते. यावेळी…
वर्धा : वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात साहित्य महामंडळ आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.5 फेब्रुवारी रोजी ‘वंचिताचे साहित्य आणि लोकशाही’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे उद्घाटन उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याच्या हस्ते होणार आहे. परिसंवादाच्या अनुषंगाने पुर्वतयारीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा घेण्यात आला. बैठकीला वर्धा येथून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, तहसिलदार रमेश कोळपे तर मुंबई येथून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप टीमचे समन्वयक उपस्थित होते. साहित्य संमेलनाच्या सभामंडपात 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता यादरम्यान…
वर्धा – क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एअर रायफल स्पर्धेत वर्ध्यातील दोन विद्यार्थ्यांनी नागपूर विभागात बाजी मारली आहे. वर्ध्यात जिल्हा स्तरावर आयोजित एअर रायफल स्पर्धेमध्ये जिल्हा स्टेडियमवर चुरशीचे सामने रंगले. यात 14 वर्षे वयोगटात न्यु इंग्लिश अकॅडमी चा विद्यार्थी ओजस रवींद्र देशमुख याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर 17 वर्षे वयोगटात सेंट अँथॉनी शाळेचा प्रथमेश विजय मेंढेवार याने पहिला क्रमांक पटकाविला. ओपन साईट रायफल प्रकारात सक्षम शाळेचा वीर जयस्वाल याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानंतर नागपूर मंडळात झालेल्या स्पर्धामध्ये ओजस रवींद्र देशमुख याने 14 वर्षे वयोगटात तर प्रथमेश विजय मेंढेवार याने 17 वर्षे वयोगटात…
वर्धा – सेलू येथील संत केजाजी मूकबधिर विद्यालयात आज महापरिनिर्वाण दिवसांवर डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन करून यावेळी विद्यार्थ्यांनी महामानवाला अभिवादन केले. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक भास्कर गुढधे यांनी महमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तर शिक्षकांनी देखील महामानवाला अभिवादन करून समाजात एकात्मतेची रुजवन व्हावी असेच मत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाला विशेष शिक्षक अमोल चंदेल, राजू काळबांडे, नितीन झोटिंग, प्रमोद नगराळे, मंगेश हांडे आदी उपस्थित होते.
वर्धा – वर्ध्यात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वर्धेकरांनी अभिवादन केले आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले,पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याच परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ फोटोची प्रदर्शनी देखील लावण्यात आली आहे. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देऊन बाबासाहेबांच्या जुन्या आठवणी जाणून घेतल्या. रिफॉरमिस्ट असोसिएशनने याचे आयोजन केले होते. डॉ. बबासाहेब आंबेडकर चौक परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली दिली.

